• बसवराज एस. बोम्मई यांची नुकतीच कर्नाटकच्या नूतन मुख्यमंत्री पदावर निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • बोम्मई हे बी. एस. येडियुरप्पा यांची जागा घेताना कर्नाटकचे २३ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

  • बोम्मई हे यापूर्वी येडियुरप्पा सरकारमध्ये गृहमंत्री पदावर कार्यरत होते.

कर्नाटक राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: बसवराज बोम्मई हे सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत.

  • राज्यपाल: थावरचंद गेहलोत हे सध्या कर्नाटकच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • राज्य स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी कर्नाटक राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी शहर: बंगळुरू ही कर्नाटकची राजधानी आहे.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने कर्नाटक देशात ६ व्या स्थानावर आहे.