• भारत सरकारमार्फत दिनेश कुमार खारा यांची ३ वर्षांच्या कालावधीसाठी भारतीय स्टेट बँकेच्या (State Bank of India - SBI) नूतन अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • दिनेश कुमार खारा यांची नियुक्ती ७ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.

  • सध्या खारा हे 'ग्लोबल बँकिंग अँड सबसिडीयरीजचे (Global Banking & Subsidiaries)' प्रभारी व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत.

  • बॅंक बोर्ड ब्युरोमार्फत (Banks Board Bureau - BBB) खारा यांची SBI च्या अध्यक्षपदाच्या दावेदारीसाठी शिफारस करण्यात आली होती.

  • ६ ऑक्टोबर रोजी मावळते अध्यक्ष रजनीश कुमार यांची मुदत संपुष्टात येत आहे.

SBI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: SBI म्हणजेच State Bank of India अर्थात भारतीय स्टेट बँक होय.

  • अध्यक्षः दिनेश कुमार खारा हे सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: १ जुलै १९५५ रोजी बँकेची स्थापना झाली होती.

  • संस्थेचे स्वरूप: सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांतर्गत येणारी संस्था असे बँकेचे स्वरूप आहे.

  • सेवा प्रदान: बँकिंग व आर्थिक सेवा SBI मार्फत पुरवल्या जातात.