-
प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (Press Trust of India - PTI) चे नूतन अध्यक्ष म्हणून आनंद बझार ग्रुप ऑफ पब्लिकेशन्सचे संपादक इमेरिटस आणि व्हाईस चेअरमन अवीक सरकार यांची निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
पंजाब केसरी वर्तमानपत्र ग्रुपचे मुख्य संपादक विजय कुमार चोप्रा यांच्यानंतर ते पदभार सांभाळतील.
-
अवीक सरकार यांनी पेंग्विन इंडियाचे संस्थापक व्यवस्थापकीय संचालकआणि बिझनेस स्टँडर्डचे (Business Standard) संस्थापक संपादक म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे.
पीटीआय (Press Trust of India - PTI) बाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे PTI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: २७ ऑगस्ट १९४७ रोजी PTI ची स्थापना झाली होती.