-
माजी लोकसभा खासदार आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता परेश रावल यांची राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या (National School of Drama - NSD) नूतन अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
ठळक मुद्दे
-
परेश रावल यांची ३ दशकांहून अधिक काळ चित्रपट कारकीर्द राहिली आहे.
-
१९९४ सालामध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला होता.
-
यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
-
करमणूक जगतातील त्यांच्या योगदानाबद्दल २०१४ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
-
१९८५ सालच्या अर्जुन या चित्रपटाद्वारे परेश रावल यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.
-
१९८६ सालच्या ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'नाम' चित्रपटाच्या प्रसिद्धीनंतर त्यांना खरी ओळख प्राप्त झाली होती.
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा बाबत (National School of Drama - NSD) महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १९५९ मध्ये संगीत नाटक अकादमीच्या विविध घटकांपैकी एक या स्वरूपात NSD ची स्थापना करण्यात आली होती.
-
ठिकाण: NSD नवी दिल्ली येथे आहे.
-
संचालक: सुरेश शर्मा हे सध्या NSD च्या संचालक पदावर कार्यरत आहेत.
-
स्वायत्त दर्जा प्राप्त वर्ष: १९७५ मध्ये NSD ला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झाले आणि स्वायत्त संस्था म्हणून नोंदणी करण्यात आली होती.
-
वैशिष्ट्यपूर्ण बाब: नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ही जगातील एक आघाडीची नाट्य प्रशिक्षण संस्था म्हणून प्रसिद्ध आहे. भारतात अशा प्रकारची ही एकमेव संस्था आहे.