-
भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी असणाऱ्या श्री. राजीव जलोटा यांची मुंबई पोर्ट ट्रस्टचे (Mumbai Port Trust - MbPT) अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीमार्फत नुकताच प्रतिनियुक्तीचा आदेश जारी करण्यात आला आहे.
-
माजी अध्यक्ष संजय भाटिया यांची महाराष्ट्राचे लोकायुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्षपद रिक्त होते.
-
महाराष्ट्रातील पहिले वस्तू व सेवा कर (Goods and Services Tax - GST) आयुक्त म्हणून कार्यरत असणारे जलोटा हे सध्या राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.
महाराष्ट्र राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: उद्धव ठाकरे हे सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळत आहेत.
-
राज्यपाल: भगतसिंग कोश्यारी हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.
-
राज्य स्थापना वर्ष: १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती.
-
राजधानीचे ठिकाण: मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो.