-
युनियन बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या राजकिरण राय यांची २०२०-२१ या कालावधीसाठी भारतीय बँकांच्या संघटनेच्या (Indian Banks’ Association - IBA) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
SBI प्रमुख पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी IBA चे अध्यक्ष म्हणून रजनीश कुमार यांचे स्थान प्राप्त केले आहे.
-
संघटनेच्या उपाध्यक्षपदी स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष दिनेशकुमार खारा यांची निवड करण्यात आली आहे.
IBA बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: IBA म्हणजेच Indian Banks’ Association अर्थात भारतीय बँकांची संघटना होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे IBA च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: सप्टेंबर १९४६ मध्ये IBA ची स्थापना करण्यात आली होती.