• मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीमार्फत श्री. सुनीत शर्मा यांची रेल्वे मंडळाचे नूतन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (Chairman & CEO) म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • १ जानेवारी २०२१ पासून श्री. शर्मा यांनी आपल्या नवीन भूमिकेचा कार्यभार स्वीकारला आहे.

  • मावळते अध्यक्ष श्री. विनोदकुमार यादव यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२० रोजी संपुष्टात आला आहे .

  • सुनीत शर्मा यांनी यापूर्वी पूर्वीय रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणूनही काम पाहिले आहे.

रेल्वे मंडळाबाबत (Railway Board) महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: मार्च १९०५ मध्ये रेल्वे मंडळाची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे रेल्वे मंडळाचे मुख्यालय आहे.

  • अध्यक्ष: सुनीत शर्मा हे सध्या रेल्वे बोर्ड अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

  • रेल्वेमंत्री: पीयूष गोयल हे सध्या रेल्वेमंत्री म्हणून कार्यरत आहेत.