-
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत (National Health Authority - NHA) श्री. आर. एस. शर्मा यांची आयुष्मान भारत (Ayushman Bharat) या देशातील प्रमुख सार्वजनिक आरोग्य विमा योजनेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
सदर योजनेला 'प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (Pradhan Mantri Jan Arogya Yojana)' असेही म्हटले जाते.
-
२०१८ मध्ये प्रारंभ झाल्यापासून आयुष्मान योजनेच्या मुख्य कार्यकारी पदावर कार्यरत असणाऱ्या इंदू भूषण यांची ते जागा घेतील.
-
आर. एस. शर्मा हे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (Telecom Regulatory Authority of India - TRAI) माजी अध्यक्ष होते.
आयुष्मान भारत योजनेबाबत महत्वपूर्ण माहिती
-
सार्वत्रिक आरोग्य विस्तारचे (Universal Health Coverage - UHC) उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य धोरण (National Health Policy - NHP) २०१७ च्या सूचनेनुसार आयुष्मान भारत ही भारत सरकारची एक प्रमुख योजना म्हणून सुरू करण्यात आली होती.
-
शाश्वत विकास लक्ष्ये (Sustainable Development Goals - SDGs) साध्य करण्यासोबतच तिची प्रतिबद्धता पूर्ण करण्यासाठी सदर उपक्रम सुरु करण्यात आला होता.