• IPS अधिकारी सुबोध कुमार जैस्वाल यांची नुकतीच केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (Central Bureau of Investigation - CBI) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • CBI संचालकपदासाठी चाळणी करण्यात आलेल्या ३ अधिकाऱ्यांपैकी ते सर्वात वरिष्ठ अधिकारी होते.

  • त्यांच्यासह के. आर. चंद्र आणि व्ही. एस. कौमुदी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील समितीमार्फत निवडण्यात आले होते.

CBI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: CBI म्हणजेच Central Bureau of Investigation अर्थात केंद्रीय अन्वेषण ब्युरो होय.

  • संचालक: सुबोध कुमार जैस्वाल हे सध्या CBI च्या संचालक पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे CBI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: १ एप्रिल १९६३ रोजी CBI ची स्थापना करण्यात आली होती.

  • ब्रीदवाक्य: 'उद्योग, निःपक्षपातीपणा, अखंडता (Industry, Impartiality, Integrity)' हे CBI चे ब्रीदवाक्य आहे.