• शबीर खंडवावाला यांची BCCI च्या नूतन 'भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग प्रमुख (BCCI Anti-Corruption Unit Chief)' पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • यापूर्वी त्यांनी गुजरातचे पोलिस महासंचालक (Director General of Police - DGP) म्हणून काम पाहिले आहे.

  • ते अजित सिंग यांची जागा घेतील.

BCCI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: BCCI म्हणजेच Board of Control for Cricket in India अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ होय.

  • अध्यक्ष: सौरव गांगुली हे सध्या BCCI अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

  • सचिव: जय शाह हे सध्या BCCI सचिव म्हणून कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे BCCI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: १९२८ साली BCCI ची स्थापना करण्यात आली होती.

  • पुरुष संघ प्रशिक्षक: रवी शास्त्री हे सध्या पुरुष संघ प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

  • महिला संघ प्रशिक्षक: डब्ल्यू. व्ही. रमण हे सध्या महिला संघ प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.