-
लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या विनीत अग्रवाल यांची असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडियाचे (The Associated Chambers of Commerce and Industry of India - ASSOCHAM) नूतन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
ते निरंजन हिरानंदानी यांची जागा घेतील.
-
रीन्यू पॉवरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असणारे सुमंत सिन्हा हे असोचेमचे नवे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत राहणार आहेत.
ASSOCHAM बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ASSOCHAM म्हणजेच The Associated Chambers of Commerce and Industry of India अर्थात असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे ASSOCHAM च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: १९२० साली ASSOCHAM ची स्थापना करण्यात आली होती.