-
लेफ्टनंट जनरल चंडी प्रसाद मोहंती यांची नुकतीच नूतन उपलष्करप्रमुख (Army Vice-Chief) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील.
-
मोहंती हे राजपूत रेजिमेंटचे जून १९८२ च्या बॅचचे इन्फंट्री अधिकारी (Infantry Officer) आहेत.
भारतीय लष्कराबाबत (Indian Army) महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १ एप्रिल १८९५ साली भारतीय लष्कराची स्थापना करण्यात आली होती.
-
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ: जनरल बिपिन रावत हे सध्या या पदावर आहेत.
-
लष्कर प्रमुख: जनरल मनोज मुकुंद नरवणे हे सध्या या पदावर आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे भारतीय लष्कराच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
ब्रीदवाक्य: 'स्वतःआधी सेवा (Service Before Self)' हे भारतीय लष्कराचे ब्रीदवाक्य आहे.
-
भारतीय लष्कर दिन: १५ जानेवारी हा भारतीय लष्कर दिन म्हणून साजरा करण्यात येतो.