• भारत सरकारमार्फत IAS अधिकारी वर्षा जोशी यांची राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या (National Dairy Development Board - NDDB) नूतन अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • NDDB चे मावळते अध्यक्ष दिलीप रथ यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबर २०२० रोजी संपला आहे.

  • जोशी यांची नियुक्ती पुढील आदेश येईपर्यंत १ डिसेंबर २०२० पासून लागू करण्यात येईल.

NDDB बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: NDDB म्हणजेच National Dairy Development Board अर्थात राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ होय.

  • स्थापना वर्ष: १९६५ साली NDDB ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: आनंद, गुजरात येथे NDDB च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • संस्थापक: वर्गीस कुरियन यांनी सादर संस्थेची स्थापना केली होती.