• नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष श्री. माँटेकसिंग अहलुवालिया यांची जागतिक बँक आणि आयएमएफने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय सल्लागार गटाच्या सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • मारी पँगेस्टु, सेला पाजारबासीओग्लू आणि लॉर्ड निकोलस स्टर्न यांच्या संयुक्त विद्यमाने सदर गटाचे नेतृत्व करण्यात येणार आहे.

  • जागतिक बँक आणि आयएमएफतर्फे कोविड-१९ तसेच हवामानातील बदलामुळे उद्भवलेल्या दुहेरी संकटाच्या पार्श्वभूमीवर सदर गट बनविण्यात आला आहे.