• आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग संघटनेच्या (International Weightlifting Federation - IWF) घटनात्मक तरतुदींनुसार कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्ये ग्रेट ब्रिटनच्या डॉ. मायकेल इराणी यांची अंतरिम अध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • IWF चे अध्यक्ष असणाऱ्या तॅम अजान यांनी राजीनामा दिल्यानंतर मायकल इराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • मायकेल इराणी यांनी याअगोदर IWF च्या वैद्यकीय समितीच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळला होता.

IWF बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: IWF म्हणजेच International Weightlifting Federation अर्थात आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग संघटना होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: बुडापेस्ट, हंगेरी हे IWF च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: १९०५ साली IWF ची स्थापना करण्यात आली होती.