-
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमार्फत (International Cricket Council - ICC) जाहीर करण्यात आले आहे की २०२७ आणि २०३१ मधील पुरूष क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ही पुन्हा एकदा १४ संघ आणि ५४ सामन्यांची स्पर्धा होईल.
ठळक मुद्दे
-
२०१९ च्या विश्वचषकात २०१५ च्या विश्वचषकातील १५ संघांच्या तुलनेत केवळ १० संघांनी भाग घेतला होता.
ICC बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ICC म्हणजेच International Cricket Council अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद होय.
-
स्थापना वर्ष: १५ जून १९०९ रोजी ICC ची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: दुबई, अरब अमिराती हे ICC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सध्याचे चेअरमन: इम्रान ख्वाजा (अंतरिम) हे सध्या ICC च्या चेअरमन पदाची धुरा सांभाळत आहेत.
-
सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी: मनु सावनी हे सध्या ICC च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा भार सांभाळत आहेत.
-
सदस्य देश: जगभरातील १०४ देश ICC चे सदस्य देश आहेत.
-
ब्रीदवाक्य: 'Cricket for good' हे ICC चे ब्रीदवाक्य आहे.