-
भारतीय एनर्जी एक्सचेंजचे (Indian Energy Exchange - IEX) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव श्रीवास्तव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भारतीय ऊर्जा विनिमय मंडळाच्या संचालक मंडळामार्फत त्यांचा राजीनामा स्विकारण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
त्यांना तातडीने २४ ऑगस्ट २०२० पासून आपल्या पदावरून मुक्त करण्यात आले आहे.
-
IEX मंडळाचे विद्यमान कार्यकारी अध्यक्ष सत्यनारायण गोयल यांच्यावर कंपनीच्या अंतरिम व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
भारतीय एनर्जी एक्सचेंज (Indian Energy Exchange - IEX) बाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: २००८ साली भारतीय एनर्जी एक्सचेंजची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे IEX च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: सत्यनारायण गोयल हे सध्या कंपनीच्या अंतरिम व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत आहेत.
-
उत्पादन निर्मिती कार्य: विद्युत शक्ती आणि ऊर्जा विनिमयसंबंधी उत्पादने कंपनीमार्फत घेतली जातात.