-
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या (Central Bank Of India) नूतन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर माटम वेंकट राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
राव यांनी आतापर्यंत कॅनरा बँकेत कार्यकारी संचालक पदाचा कार्यभार सांभाळला आहे.
-
राव हे भारतीय बॅंकर्स संस्थेचे (Indian Institute of Bankers) प्रमाणित सहयोगी आहेत.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया बाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई हे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी: माटम वेंकट राव हे या पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १९११ साली सेंट्रल बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली होती.