• जे. वेंकटरामू यांची इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे (India Post Payments Bank - IPPB) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • मावळते अधिकारी सुरेश सेठी यांच्यानंतर ते या पदावर विराजमान होतील.

  • जे. वेंकटरामू हे सध्या इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेमध्ये (Equitas Small Finance Bank) मुख्य डिजीटल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

  • ३ वर्षांच्या कालावधीसाठी त्यांची IPPB च्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेबाबत (India Post Payments Bank) महत्वपूर्ण माहिती

  • अनावरण वर्ष: २०१८ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे अनावरण करण्यात आले होते.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.