-
ICC पॅनेलमधील ख्रिस ब्रॉड भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship - WTC) अंतिम सामन्यात रेफरी म्हणून कामकाज पाहणार आहेत.
ठळक मुद्दे
-
१८ जून २०२१ पासून साऊथॅम्प्टनमधील एजस बाऊल येथे हा सामना खेळविण्यात येणार आहे.
-
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमार्फत (International Cricket Council - ICC) अधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे.
-
ICC पॅनेलचे रिचर्ड आयलिंगवर्थ आणि मायकेल गॉफ हे मैदानावरील पंच म्हणून काम पाहतील.
ICC बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ICC म्हणजेच International Cricket Council अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद होय.
-
स्थापना वर्ष: १५ जून १९०९ रोजी ICC ची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: दुबई, अरब अमिराती हे ICC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सध्याचे चेअरमन: ग्रेग बार्कले हे सध्या ICC च्या चेअरमन पदाची धुरा सांभाळत आहेत.
-
सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी: मनु सावनी हे सध्या ICC च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा भार सांभाळत आहेत.
-
सदस्य देश: जगभरातील १०४ देश ICC चे सदस्य देश आहेत.
-
ब्रीदवाक्य: 'Cricket for good' हे ICC चे ब्रीदवाक्य आहे.