-
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमार्फत (International Cricket Council - ICC) मनू सावनी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer - CEO) पदावरून पदमुक्त करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
ICC मंडळाच्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला आहे.
-
जॉफ अलार्डिस हे कार्यवाहक मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत राहतील.
ICC बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ICC म्हणजेच International Cricket Council अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद होय.
-
स्थापना वर्ष: १५ जून १९०९ रोजी ICC ची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: दुबई, अरब अमिराती हे ICC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सध्याचे चेअरमन: ग्रेग बार्कले हे सध्या ICC च्या चेअरमन पदाची धुरा सांभाळत आहेत.
-
सध्याचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी: जॉफ अलार्डिस हे सध्या ICC च्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा भार सांभाळत आहेत.
-
सदस्य देश: जगभरातील १०४ देश ICC चे सदस्य देश आहेत.
-
ब्रीदवाक्य: 'Cricket for good' हे ICC चे ब्रीदवाक्य आहे.