-
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीमार्फत सिद्धार्थ मोहंती यांची भारतीय जीवन विमा निगम (Life Insurance Corporation - LIC) च्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
श्री. मोहंती हे सध्या LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (LIC Housing Finance Limited) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
-
ते मावळते अधिकारी टीसी सुशील कुमार यांच्या जागी पदभार स्वीकारतील.
LIC बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: LIC म्हणजेच Life Insurance Corporation of India अर्थात भारतीय जीवन विमा निगम होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे LIC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
अध्यक्ष: एम. आर. कुमार हे सध्या LIC च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १ सप्टेंबर १९५६ रोजी LIC ची स्थापना करण्यात आली होती.