• राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव 'मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार' असे करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी सदर घोषणा केली आहे.

  • मेजर ध्यानचंद यांनी भारतीय हॉकीचे प्रतिनिधित्व करताना देशासाठी ३ ऑलिम्पिक सुवर्ण पदके जिंकली आहेत.

  • ध्यानचंद यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय क्रीडा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.

खेल रत्न पुरस्कारांबाबत महत्वपूर्ण माहिती

  • पुरस्काराची सुरुवात: १९९१-९२ साली सदर पुरस्काराची सुरुवात करण्यात आली होती.

  • पुरस्काराचे स्वरूप: पदक, प्रमाणपत्र आणि २५ लाख रुपये रोख असे सदर पुरस्काराचे स्वरूप आहे.

  • प्रथम पुरस्कार विजेता: बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद हे या पुरस्काराचे पहिले विजेते आहेत.