• भारत सरकारमार्फत एम. राजेश्वर राव यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India - RBI) नूतन डेप्युटी गव्हर्नर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • डेप्युटी गव्हर्नर पदाचा कार्यभार सांभाळण्यापूर्वी एम. राजेश्वर राव हे RBI चे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते.

  • रिझर्व्ह बँकेचे चौथे डेप्युटी गव्हर्नर म्हणून ते एन. एस. विश्वनाथन यांच्यानंतर कार्यभार सांभाळतील.

  • आरोग्याच्या कारणास्तव एन. एस. विश्वनाथन यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच पदाचा राजीनामा दिला आहे.

RBI चे सध्याचे अन्य ३ डेप्युटी गव्हर्नर

  • एम. डी. पात्रा

  • बी. पी. कानुंगो

  • एम. के. जैन

RBI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: RBI म्हणजेच Reserve Bank of India अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया होय.

  • सध्याचे गव्हर्नर: शक्तीकांत दास हे सध्या RBI चे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे RBI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना: १ एप्रिल १९३५ रोजी कोलकाता येथे RBI ची स्थापना झाली होती.