-
मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही. एम. कानडे यांची महाराष्ट्राचे नूतन लोकायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याशी सल्लामसलत करून सदर नियुक्तीस मान्यता दिली आहे.
-
माजी लोकायुक्त निवृत्त न्यायमूर्ती एम. एल. तहलियानी यांनी ऑगस्ट २०२० मध्ये आपला कार्यकाळ पूर्ण केला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते.