-
टोकियो गेम्सच्या धर्तीवर नुकतेच भारताच्या ‘लक्ष्य तेरा सामने है’ या अधिकृत ऑलिम्पिक थीम गाण्याचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
मोहित चौहान यांनी सदर गाणे संगीतबद्ध केले आहे.
-
आतापर्यंत १०० हून अधिक भारतीय खेळाडूंनी सदर स्पर्धेसाठी आपली पात्रता दर्शविली आहे.
-
सदर कार्यक्रम भारतीय ऑलिम्पिक संघटनेमार्फत (Indian Olympic Association - IOA) आयोजित करण्यात आला होता.
-
क्रीडामंत्री श्री. किरेन रिजिजू हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.