• तमिळनाडूतील ज्येष्ठ भाजप नेते ला. गणेशन यांची नुकतीच मणिपूरच्या नूतन राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • नजमा हेपतुल्ला यांच्या सेवानिवृत्तीनंतर हे पद रिक्त होते.

  • सिक्कीमचे राज्यपाल गंगा प्रसाद यांच्याकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.

मणिपूर राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: एन. बिरेन सिंग हे सध्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • राज्यपाल: ला. गणेशन हे सध्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • भारतात विलीनीकरण: १५ ऑक्टोबर १९४९ रोजी मणिपूरचे भारतात विलीनीकरण संपन्न झाले होते.