• क्रीडामंत्री श्री. किरेन रिजिजू यांच्यामार्फत योगासनाला स्पर्धात्मक खेळ म्हणून विकसित करण्यासाठी 'खेलो इंडिया युथ गेम्स (Khelo India Youth Games)' २०२१ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर प्रस्तावानुसार, खेलो इंडिया यूथ गेम्स, २०२१ मध्ये पुरुष व महिला अशा दोन्ही प्रकारातील योगासन खेळाचा समावेश करण्यात आला आहे.

  • सरकारतर्फे देशातील योगासनाच्या विकासासाठीच्या उद्देशपूर्तीसाठी राष्ट्रीय योगासन क्रीडा महासंघाला (National Yogasana Sports Federation - NYSF) मान्यता देण्यात आली आहे.

  • नोव्हेंबर २०१९ मध्ये सरचिटणीस एचआर नागेंद्र यांच्यासह योगगुरू बाबा रामदेव यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय योगासन क्रीडा महासंघाची (International Yogasana Sports Federation) स्थापना करण्यात आली होती.