-
जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या चीनच्या चेन मेंगने आपल्याच देशाच्या प्रतिस्पर्धी खेळाडू असणाऱ्या सन यिंगषाला पराभूत करून आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघ (International Table Tennis Federation - ITTF) महिला विश्वचषक विजेतेपदाला गवसणी घातली आहे.
ठळक मुद्दे
-
चेन मेंगने चीनमधील वेहाई येथे संपन्न झालेल्या महिलांच्या पहिल्या ITTF महिला विश्वचषक टेबल टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.
-
२०२० सालची ITTF महिला विश्वचषक स्पर्धा ही सदर कार्यक्रमाची २४ वी आवृत्ती होती.
ITTF बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ITTF म्हणजेच International Table Tennis Federation अर्थात आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघ होय.
-
अध्यक्ष: थॉमस वेकर्ट हे सध्या ITTF च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: लॉझने, स्वित्झर्लंड हे ITTF च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: १९२६ साली ITTF ची स्थापना करण्यात आली होती.
-
सदस्य संघटना: सध्या ITTF च्या २२६ सदस्य संघटना आहेत.