-
भारतीय टेनिसपटू अंकिता रैनाने दुबईमध्ये आयोजित स्पर्धेत जॉर्जियन भागीदार एकटेरिन गॉरगोड्झे सोबत संयुक्तपणे २०२० 'अल हबटूर टेनिस चॅलेंज (Al Habtoor Tennis Challenge)' चे विजेतेपद मिळवले आहे.
ठळक मुद्दे
-
अंकिता रैनाने या मोसमातील दुहेरीचे तिसरे विजेतेपद मिळविले आहे.
-
स्पेनच्या अॅलिओना बोलसोवा झडोइनोव आणि स्लोव्हाकियन काजा जुवानच्या जोडीला पराभूत करून त्यांनी जेतेपद मिळवले आहे.
अल हबटूर टेनिस चॅलेंज स्पर्धेबाबत महत्वपूर्ण माहिती
-
अल हबटूर टेनिस चॅलेंज ही एक व्यावसायिक महिला टेनिस स्पर्धा आहे.
-
१९९८ पासून संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई येथे दरवर्षी आयोजित ITF महिलांच्या जागतिक टेनिस स्पर्धेचा हा एक भाग आहे.