-
ड्रीम ११ प्रायोजक असलेल्या १३ व्या इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League - IPL) २०२० च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून पाचव्यांदा आयपीएल करंडक जिंकला आहे.
ठळक मुद्दे
-
विजयासाठी आवश्यक १५७ धावांचा पाठलाग करताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने ५१ चेंडूत ६८ धावा फटकावल्या.
-
२०१९ सालच्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून मुंबई चषक विजेता ठरला होता.
-
चेन्नई सुपर किंग्जनंतर आता विजेतेपद टिकविणारा मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ ठरला आहे.
-
किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार के. एल. राहुल ऑरेंज कॅप विजेता ठरला. आयपीएल २०२० मध्ये सर्वाधिक धावा बनवण्याच्या क्रमवारीमध्ये तो आघाडीवर राहिला. १४ सामन्यांत ५५.८३ च्या सरासरीने त्याने ६७० धावा बनवल्या.
-
दिल्ली कॅपिटल्सचा कागिसो रबाडा सर्वाधिक बळींसह पर्पल कॅपचा विजेता बनला.
पुरस्कारप्राप्त विजेत्यांची यादी
-
आयपीएल २०२० अंतिम सामन्यात गेम चेंजर ऑफ द मॅच म्हणून निवड: रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स कर्णधार)
-
आयपीएल २०२० अंतिम सामन्यात सामनावीर म्हणून निवड: ट्रेंट बोल्ट (मुंबई इंडियन्स)
-
ऑरेंज कॅप विजेता: के. एल. राहुल (किंग्ज इलेव्हन पंजाब कर्णधार)
-
पर्पल कॅप विजेता: कागिसो रबाडा (दिल्ली कॅपिटल्स)
-
गेम चेंजर ऑफ द सीझनः के. एल. राहुल (किंग्ज इलेव्हन पंजाब कर्णधार)
-
हंगामातील उदयोन्मुख खेळाडू: देवदत्त पडीक्कल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)
-
सर्वाधिक मूल्यवान खेळाडू: जोफ्रा आर्चर (राजस्थान रॉयल्स)