-
नेमबाजीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या भारताच्या इलावेनील वालारीवननेने २०२० च्या शेख रसेल आंतरराष्ट्रीय एअर रायफल चॅम्पियनशिप (Sheikh Russel International Air Rifle Championship) महिला गटामध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
ठळक मुद्दे
-
सदर कार्यक्रम हा बांगलादेश नेमबाजी क्रीडा संघटनेमार्फत (Bangladesh Shooting Sport Federation) आयोजित करण्यात आला होता.
-
पुरुष गटामध्ये जपानच्या नाओया ओकाडाने सुवर्णपदकाला गवसणी घातली तर भारताच्या शाहू तुषार माने याने रौप्यपदक जिंकले.
-
सदर स्पर्धेत भारत, बांगलादेश, जपान, कोरिया, इंडोनेशिया आणि भूतान या ६ देशातील नेमबाजांनी भाग घेतला होता.