• कार्मिक मंत्रालयांतर्गत कार्यरत कार्मिक व प्रशिक्षण विभागामार्फत प्रविण सिन्हा यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (Central Bureau of Investigation - CBI) अंतरिम संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सिन्हा यांची तातडीने नियुक्ती करण्यात आली आहे.

  • ते मावळते संचालक आर. के. शुक्ला यांची जागा घेतील.

  • १९८८ च्या गुजरात केडरचे भारतीय पोलीस सेवेचे (IPS) अधिकारी असणारे सिन्हा हे सध्या CBI चे अतिरिक्त संचालक आहेत.

CBI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: CBI म्हणजेच Central Bureau of Investigation अर्थात केंद्रीय अन्वेषण ब्युरो होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे CBI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: १ एप्रिल १९६३ रोजी CBI ची स्थापना करण्यात आली होती.

  • ब्रीदवाक्य: 'उद्योग, निःपक्षपातीपणा, अखंडता (Industry, Impartiality, Integrity)' हे CBI चे ब्रीदवाक्य आहे.