• ICC मार्फत भारताच्या विनू मंकड यांच्यासह १० जणांना 'आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये (ICC Hall of Fame)' समाविष्ट करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • हॉल ऑफ फेममध्ये क्रिकेटच्या ५ युगांतील प्रत्येकी २ खेळाडू समाविष्ट करण्यात आले आहेत.

  • भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये १८ जूनपासून साऊथॅम्प्टन येथे होणाऱ्या 'जागतिक कसोटी चँपियनशिपच्या (World Test Championship - WTC)' अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर सदर घोषणा करण्यात आली आहे.

समाविष्ट केले जाणारे १० प्रख्यात खेळाडू

  • औब्रे फॉकनर (दक्षिण आफ्रिका)

  • मोंटी नोबल (ऑस्ट्रेलिया)

  • सर लरी कॉन्स्टँटाईन (वेस्ट इंडीज)

  • स्टॅन मॅककेब (ऑस्ट्रेलिया)

  • टेड डेकस्टर (इंग्लंड)

  • विनू मंकड (भारत)

  • डेसमॉन्ड हेन्स (वेस्ट इंडीज)

  • बॉब विलिस (इंग्लंड)

  • अँडी फ्लॉवर (झिम्बाब्वे)

  • कुमार संगकारा (श्रीलंका)