• विशाल व्ही. शर्मा यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेमध्ये (United Nations Educational, Scientific and Cultural Organization - UNESCO) भारताचे पुढील कायमस्वरूपी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • शर्मा हे मावळते प्रतिनिधी जावेद अश्रफ यांची जागा घेतील.

UNESCO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization अर्थात संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स हे UNESCO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • संस्थेचे प्रमुख: ऑड्रे अझोले हे सध्या UNESCO च्या प्रमुख पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: १९४५ साली UNESCO ची स्थापना करण्यात आली होती.