-
गोव्याचा रहिवासी असणारा १४ वर्षीय लिओन मेंडोंका नुकताच इटलीमधील स्पर्धा जिंकत भारताचा ६७ वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर (Chess Grandmaster) बनला आहे.
ठळक मुद्दे
-
मेंडोंका याने १४ वर्षे, ९ महिने आणि १७ दिवसांच्या कालावधीमध्ये सदर कामगिरी केली आहे.
-
जुलै महिन्यात चेन्नईचा खेळाडू जी. आकाश हा देशाचा ६६ वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला होता.
आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघाबाबत (International Chess Federation) महत्वपूर्ण माहिती
-
अध्यक्ष: अर्काडी ड्वोरकोविच हे सध्या आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघाच्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: लॉझने, स्वित्झर्लंड हे सदर महासंघाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: २० जुलै १९२४ रोजी महासंघाची स्थापना करण्यात आली होती.
-
सदस्यत्व: १९५ राष्ट्रीय संघटना या आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघाच्या सदस्य आहेत.