-
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमार्फत (International Cricket Council - ICC) पुष्टी करण्यात आली आहे की कोविड -१९ च्या कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेला २०२० मधील नियोजित आयसीसी पुरूष टी -२० विश्वचषक हा ऑस्ट्रेलियामध्ये २०२२ मध्ये होणार आहे.
ठळक मुद्दे
-
नियोजनाप्रमाणे भारताकडून आयसीसी पुरूष टी -२० वर्ल्ड कप २०२१ चे आयोजन करण्यात येईल.
-
कोविड -१९ मुळे जागतिक स्तरावर क्रिकेटवर होणार्या परिणामांमुळे आयसीसीने न्यूझीलंडमध्ये नियोजित करण्यात आलेला आयसीसी महिलांचा विश्वकरंडक २०२१, फेब्रुवारी-मार्च २०२२ पर्यंत तहकूब करण्याचा निर्णय घेतला आहे.
ICC बाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १५ जून १९०९ रोजी ICC ची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: दुबई, अरब अमिराती हे ICC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सध्याचे चेअरमन: इम्रान ख्वाजा (अंतरिम) हे सध्या ICC च्या चेअरमन पदाची धुरा सांभाळत आहेत.
-
सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी: मनु सावनी हे सध्या ICC च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा भार सांभाळत आहेत.
-
सदस्य देश: जगभरातील १०४ देश ICC चे सदस्य देश आहेत.
-
ब्रीदवाक्य: 'Cricket for good' हे ICC चे ब्रीदवाक्य आहे.