• तुम्माला श्रीनिवास कुमार यांनी भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती प्रणाली केंद्राच्या (Indian National Centre for Ocean Information System - INCOIS) नूतन संचालकपदाचा पदभार स्वीकारला आहे.

ठळक मुद्दे

  • पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी INCOIS ही भारत सरकारची एक स्वायत्त संस्था आहे.

  • २०११ मध्ये युनेस्कोच्या आंतर सरकारी महासागर आयोगाकडून (Intergovernmental Oceanographic Commission of UNESCO - IOC-UNESCO) भारतीय त्सुनामी पूर्व चेतावणी केंद्राला (Indian Tsunami Early Warning Centre) त्सुनामी सेवा प्रदाता (Tsunami Service Provider - TSP) म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

IOC-UNESCO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: IOC-UNESCO म्हणजेच Intergovernmental Oceanographic Commission of UNESCO अर्थात युनेस्कोचा आंतर सरकारी महासागर आयोग होय.

  • स्थापना वर्ष: १९६० साली सदर संस्थेची स्थापना झाली होती.

  • संस्थेचे विशेषत्व: सदर IOC-UNESCO ही संयुक्त राष्ट्रांची संघटना आहे जी जागतिक महासागर विज्ञान आणि सेवांना पाठबळ देण्यास जबाबदार आहे.

  • संस्थेचे कार्य: सदर संस्था आपल्या १५० सदस्य राष्ट्रांना सामायिक समुद्र आरोग्यासाठी एकत्र काम करण्यास सक्षम करण्याचे कार्य करते.