• 'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (International Cricket Council - ICC)' २०२१ सालचा पुरूष टी - २० विश्वचषक युएईमध्ये संपन्न होणार आहे.

ठळक मुद्दे

  • यापूर्वी हा विश्वचषक भारतात आयोजित करण्यात येणार होता.

  • १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीमध्ये सदर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

ICC बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ICC म्हणजेच International Cricket Council अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद होय.

  • स्थापना वर्ष: १५ जून १९०९ रोजी ICC ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: दुबई, अरब अमिराती हे ICC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • सध्याचे चेअरमन: ग्रेग बार्कले हे सध्या ICC च्या चेअरमन पदाची धुरा सांभाळत आहेत.

  • सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी: मनु सावनी हे सध्या ICC च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा भार सांभाळत आहेत.

  • सदस्य देश: जगभरातील १०४ देश ICC चे सदस्य देश आहेत.

  • ब्रीदवाक्य: 'Cricket for good' हे ICC चे ब्रीदवाक्य आहे.

BCCI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: BCCI म्हणजेच Board of Control for Cricket in India अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ होय.

  • अध्यक्ष: सौरव गांगुली हे सध्या BCCI अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

  • सचिव: जय शाह हे सध्या BCCI सचिव म्हणून कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे BCCI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: १९२८ साली BCCI ची स्थापना करण्यात आली होती.

  • पुरुष संघ प्रशिक्षक: रवी शास्त्री हे सध्या पुरुष संघ प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

  • महिला संघ प्रशिक्षक: रमेश पोवार हे सध्या महिला संघ प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.