-
२०१६ रिओ पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या मरिअप्पन थंगवेलूच्या जागी आशियाई क्रीडा सुवर्णपदक विजेता टेकचंद टोकियो पॅरालिम्पिक उद्घाटन समारंभात भारताचा नवीन ध्वजवाहक बनणार आहे.
ठळक मुद्दे
-
पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियामार्फत सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार टोकियोला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये मरिअप्पन हा कोविड पॉझिटिव्ह परदेशी प्रवाशाच्या सान्निध्यात आला होता.
-
चाचणीचे सर्व अहवाल निगेटिव्ह आले असले तरी आयोजक समितीमार्फत उद्घाटन समारंभात त्याला सहभागी न होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
-
सदर स्पर्धेमध्ये ५४ पॅरा-अॅथलीट्स भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.