-
भारतात ऑक्टोबर २०२२ मध्ये फिफा अंडर-१७ महिला विश्वचषक स्पर्धा संपन्न होणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
यापूर्वी भारत २०२० मध्ये सदर विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणार होता पण कोविड - १९ साथीच्या आजारामुळे ती २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.
FIFA बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: FIFA म्हणजेच Fédération Internationale de Football Association अर्थात आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना होय.
-
अध्यक्ष: जियानी इन्फॅंटिनो हे सध्या FIFA च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: २१ मे १९०४ रोजी FIFA ची स्थापन करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: झुरिच, स्वित्झर्लंड हे FIFA च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सदस्यत्व: २११ राष्ट्रीय संघटना FIFA च्या सदस्य आहेत.
-
ब्रीदवाक्य: 'For the Game. For the World.' हे सदर संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.