-
इंडो-तिबेटियन सीमा पोलीस (Indo-Tibetan Border Police - ITBP) ने अंतिम सामन्यात लडाखवर विजय मिळवत भारतीय आईस हॉकी संघटनेच्या (Ice Hockey Association of India - IHAI) १० व्या राष्ट्रीय आईस हॉकी चॅम्पियनशिप चषकाचे विजेतेपद पटकाविले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर सामना गुलमर्ग आईस रिंक येथे पार पडला.
-
लडाख ही भारतातील आईस हॉकीची राजधानी मानली जाते.
-
भारतातील आईस हॉकीच्या पहिल्या ८ संघांनी सदर स्पर्धेत भाग घेतला होता.
ITBP बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ITBP म्हणजेच Indo-Tibetan Border Police अर्थात इंडो-तिबेटियन सीमा पोलीस होय.
-
स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९६२ रोजी ITBP ची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे ITBP च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
महासंचालक: एस. एस. देसवाल हे सध्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.
IHAI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: IHAI म्हणजेच Ice Hockey Association of India अर्थात भारतीय आईस हॉकी संघटना होय.
-
अध्यक्ष: के. एल. कुमार हे सध्या IHAI च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: २७ एप्रिल १९८९ रोजी IHAI ची स्थापना करण्यात आली होती.