• बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन आणि वेस्ट इंडिज महिला संघाची कर्णधार स्टॅफनी टेलर यांची अनुक्रमे जुलै महिन्यासाठीच्या पुरुष आणि महिला गटातील ICC 'प्लेयर ऑफ द मंथ (Player of the month)' पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • शाकिब अल हसनला वेस्ट इंडिजचा हेडन वॉल्श जूनियर आणि ऑस्ट्रेलियाचा मिशेल मार्श यांच्यासह नामांकन प्रदान करण्यात आले होते.

ICC बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ICC म्हणजेच International Cricket Council अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद होय.

  • स्थापना वर्ष: १५ जून १९०९ रोजी ICC ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: दुबई, अरब अमिराती हे ICC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • सध्याचे चेअरमन: ग्रेग बार्कले हे सध्या ICC च्या चेअरमन पदाची धुरा सांभाळत आहेत.

  • सध्याचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी: जॉफ अलार्डिस हे सध्या ICC च्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा भार सांभाळत आहेत.

  • सदस्य देश: जगभरातील १०४ देश ICC चे सदस्य देश आहेत.

  • ब्रीदवाक्य: 'Cricket for good' हे ICC चे ब्रीदवाक्य आहे.