-
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस, पाकिस्तानचे महान फलंदाज झहीर अब्बास आणि ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार लिसा स्थळेकर यांना एका व्हर्च्युअल सोहळ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या हॉल ऑफ फेममध्ये (International Cricket Council’s Hall of Fame) स्थान देण्यात आले आहे.
जॅक कॅलिसबाबत महत्वपूर्ण माहिती
-
कॅलिस हा दक्षिण आफ्रिका संघाचा महान अष्टपैलू खेळाडू म्हणून गणला जातो.
-
कॅलिसने १९९५ ते २०१४ या कालावधी दरम्यान १६६ कसोटी, ३२८ एकदिवसीय सामने आणि २८ टी -२० सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले आहे.
-
हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणारा कॅलिस हा दक्षिण आफ्रिकेचा चौथा खेळाडू ठरला आहे.
झहीर अब्बासबाबत महत्वपूर्ण माहिती
-
झहीर अब्बास हे पाकिस्तान संघाचे माजी महान खेळाडू म्हणून गणले जातात.
-
झहीर अब्बास यांनी पाकिस्तानकडून ७८ कसोटी आणि ६२ एकदिवसीय सामने खेळताना अनुक्रमे ५०६२ आणि २५७२ धावा केल्या आहेत.
-
हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारे अब्बास हे ६ वे पाकिस्तानी खेळाडू ठरले आहेत.
लिसा स्थळेकरबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थळेकर यांनी ८ कसोटी, १२५ एकदिवसीय आणि ५४ टी-२० सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे.
-
स्थळेकर ऑस्ट्रेलियाच्या एकूण २७ व्या आणि यादीतल्या ९ व्या महिला खेळाडू ठरल्या आहेत.
-
यामध्ये त्यांच्या देशातील ५ महिला खेळाडू समाविष्ट आहेत.
ICC बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ICC म्हणजेच International Cricket Council अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती होय.
-
स्थापना वर्ष: १५ जून १९०९ रोजी ICC ची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: दुबई, अरब अमिराती हे ICC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सध्याचे चेअरमन: इम्रान ख्वाजा (अंतरिम) हे सध्या ICC च्या चेअरमन पदाची धुरा सांभाळत आहेत.
-
सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी: मनु सावनी हे सध्या ICC च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा भार सांभाळत आहेत.
-
सदस्य देश: जगभरातील १०४ देश ICC चे सदस्य देश आहेत.
-
ब्रीदवाक्य: 'Cricket for good' हे ICC चे ब्रीदवाक्य आहे.