-
प्रा. मुकेश शर्मा यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization - WHO) जागतिक वायू प्रदूषण आणि आरोग्य - तांत्रिक सल्लागार गटाच्या (Global Air Pollution and Health – Technical Advisory Group - GAPH - TAG) मानद सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
श्री. मुकेश शर्मा हे IIT कानपूर येथील प्राध्यापक आहेत.
-
IIT कानपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाशी संबंधित तसेच हवा गुणवत्ता तज्ज्ञ असलेल्या शर्मा यांनी धोरणात्मक गुंतवणूकीसह संशोधन कार्य केले आहे.
WHO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: WHO म्हणजेच World Health Organization अर्थात जागतिक आरोग्य संघटना होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: जिनिव्हा, स्वित्झर्लंड हे WHO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: ७ एप्रिल १९४८ रोजी WHO ची स्थापना करण्यात आली होती.
-
महासंचालक: टेड्रोस अडॅनॉम सध्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.