-
भारतीय क्रिकेट नियामक मंडळामार्फत (Board of Control for Cricket in India - BCCI) रमेश पोवार यांची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
सुलक्षणा नाईक, मदन लाल आणि रुद्र प्रताप सिंग यांचा समावेश असलेल्या ३ सदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीतर्फे पोवार यांच्या नियुक्तीवर एकमताने सहमती दर्शविण्यात आली.
-
पोवार यांनी भारताकडून २ कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामने खेळले आहेत.
BCCI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: BCCI म्हणजेच Board of Control for Cricket in India अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ होय.
-
अध्यक्ष: सौरव गांगुली हे सध्या BCCI अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
-
सचिव: जय शाह हे सध्या BCCI सचिव म्हणून कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे BCCI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: १९२८ साली BCCI ची स्थापना करण्यात आली होती.
-
पुरुष संघ प्रशिक्षक: रवी शास्त्री हे सध्या पुरुष संघ प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
-
महिला संघ प्रशिक्षक: रमेश पोवार हे सध्या महिला संघ प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.