-
पोलंड ओपनमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने नुकतेच ५३ किलो गटात सुवर्णपदक पटकाविले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर विजेतेपद हे तिचे या मोसमातील तिसरे जेतेपद आहे.
-
यापूर्वी तिने मॅटीओ पेलिकॉन इव्हेंटमध्ये आणि एशियन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
-
अंतिम फेरीत युक्रेनच्या क्रिस्तिना बेरेझाचा पराभव करत तिने या जेतेपदावर आपले नाव कोरले आहे.