-
माहिती व प्रसारण मंत्रालयामार्फत (Ministry of Information and Broadcasting) शेखर कपूर यांची भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेच्या (Film and Television Institute of India - FTII) प्रशासक मंडळाचे नूतन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
शेखर कपूर यांचा कार्यकाळ मार्च २०२३ पर्यंत असेल.
-
हिंदी सिनेसृष्टीमध्ये मासूम (१९८३), मिस्टर इंडिया (१९८७), बॅंडिट क्वीन (१९९४) आणि एलिझाबेथ (१९९८) सारख्या अत्यंत उल्लेखनीय चित्रपटांसाठी शेखर कपूर प्रसिद्ध आहेत.
-
मावळते अध्यक्ष असणाऱ्या दूरदर्शनवरील निर्माते बी. पी. सिंह यांचा कार्यकाळ मार्च २०२० मध्ये संपला होता. मात्र कोरोना विषाणूच्या एकंदरीत परिस्थितीमुळे त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.
FTII बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: FTII म्हणजेच Film and Television Institute of India अर्थात भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था होय.
-
स्थापना वर्ष: १९६० साली FTII ची स्थापना झाली होती.
-
संचालक: भूपेंद्र कैंथोला हे सध्या FTII च्या संचालक पदावर विराजमान आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: पुणे, महाराष्ट्र येथे FTII चे मुख्यालयाचे ठिकाण आहे.