-
श्रीलंकेचा माजी खेळाडू आणि प्रशिक्षक नुवान झोयसावर ६ वर्षांसाठी सर्व प्रकारच्या क्रिकेटवर बंदी घालण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
ICC च्या लाचलुचपत प्रतिबंधक न्यायाधिकरणातर्फे ICC च्या भ्रष्टाचारविरोधी संहितेचा भंग केल्याबद्दल झोयसा दोषी आढळला आहे.
ICC बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ICC म्हणजेच International Cricket Council अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद होय.
-
स्थापना वर्ष: १५ जून १९०९ रोजी ICC ची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: दुबई, अरब अमिराती हे ICC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सध्याचे चेअरमन: ग्रेग बार्कले हे सध्या ICC च्या चेअरमन पदाची धुरा सांभाळत आहेत.
-
सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी: मनु सावनी हे सध्या ICC च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा भार सांभाळत आहेत.
-
सदस्य देश: जगभरातील १०४ देश ICC चे सदस्य देश आहेत.
-
ब्रीदवाक्य: 'Cricket for good' हे ICC चे ब्रीदवाक्य आहे.