• श्रीनगरमध्ये जन्मलेले वुशु प्रशिक्षक आणि जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेशातील पहिले द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुलदीप हंडू यांना 'फिट इंडिया चळवळीचे (Fit India Movement)' राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • टीम इंडियाचे वुशु प्रशिक्षक म्हणून त्यांनी ११ राष्ट्रीय तसेच ६ आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदके जिंकली आहेत.

  • हंडू यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी जागतिक स्पर्धेत २ आणि विश्वचषकामध्ये १ सुवर्णपदक जिंकले आहे.

फिट इंडिया चळवळीबाबत महत्वपूर्ण माहिती

  • ऑगस्ट २०१९ मध्ये ही चळवळ सुरू करण्यात आली होती.

  • निरोगी आणि तंदुरुस्त जीवनशैलीचे महत्व पटवून देण्यासाठी तसेच दैनंदिन जीवनात तंदुरुस्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ही चळवळ सुरु करण्यात आली होती.